मुंबई
डि मार्ट सुपरमार्केटच्या माध्यमातून यशस्वी व्यवसाय करणाऱया राधाकिशन दमानी यांनी इंडिया सिमेंटस्मध्ये मोठा हिस्सा खरेदी करण्याचा इरादा केला आहे. अधिकचा वाटा घेत इंडिया सिमेंटस् कंपनी ताब्यात घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दमानींची मालकी असणाऱया ऍव्हेन्यू सुपर मार्केटस्ने इंडिया सिमेंटस्च्या एन. श्रीनिवासन यांच्याशी या आगामी व्यवहाराबाबत औपचारिक चर्चा केली आहे. येणाऱया काही दिवसातच याबाबत स्पष्टीकरण होण्याची शक्यता आहे. इंडिया सिमेंटस्ची पूर्ण मालकी देण्याऐवजी काही हिस्सा विकला जाण्याची शक्मयता या भागीदारीत दिसून येईल, असं सांगितलं जातंय.