सेन्सेक्स 97 अंकांनी घसरला : निफ्टी 9,900 च्या खाली
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील तिसऱया दिवशी मुंबई शेअर बाजारात चढ उताराच्या प्रवासामध्ये घसरणीसह बाजार बंद झाला आहे. सेन्सेक्सची 97 अंकांनी घसरण झाल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये प्रामुख्याने भारत आणि चीन यांच्या सीमेवरील तणावाच्या पडसादाचा प्रभाव बाजारातील कामगिरीवर राहिला होता तर दुसऱया बाजूला कोविड19 च्या वाढत्या संसर्गाच्या परिणामाचे पडसाद आर्थिक स्थितीवर होणार असल्याचे संकेतही व्यक्त केले जात आहेत.
दिवसअखेर बुधवारी सेन्सेक्स 97.30 अंकांनी घसरुन निर्देशांक 33,507.92 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 32.85 अंकांनी घसरुन 9,881.15 वर बंद झाला आहे. प्रमुख 30 कंपन्यांच्या समभागाच्या सेन्सेक्समध्ये 600.70 अंकांचा चढ उतार राहिल्याचे दिसून आले.
दिग्गज कंपन्यांमध्ये कोटक बँकेचे समभाग सर्वाधिक नुकसानीत राहिले असून बँकेचे समभाग 2 टक्क्मयांनी घसरले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये आयटीसी, पॉवरग्रिड कॉर्प, महिंदा ऍण्ड महिंद्रा, एचडीएफसी, एशियन पेन्ट्स आणि एनटीपीसीचे समभाग घसरले आहेत. मात्र अन्य कंपन्यांमध्ये मारुती सुझुकीचे समभाग 4 टक्क्मयांनी वधारले आहेत. याच्या व्यतिरिक्त भारती एअरटेल,
ऍक्सिस बँक, इंडसइंड बँक आणि बजाज फायनान्सचे समभागही तेजीत राहिले आहेत.
दिवसभरातील व्यवहारादरम्यान चीन-भारत सीमा वाद आणि कोविड19 चे वाढते प्रमाण याचा परिणाम विदेशी गुंतवणूकादारांवर पडला आहे. कारण लडाख सीमेवर चीन सैनिकांच्या संघर्षात देशातील 20 सैनिक शहिद तर चीनचे 40 सैनिक शहिद झाले असल्याची माहिती आहे. तसेच दुसरीकडे कोविडचा वाढता प्रभावही शेअर बाजारातील कामगिरीवर परिणाम करणारा ठरला. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1 हजार 478.52 कोटींचे समभाग मंगळवारी विकले असल्याचे समजते.