ऑनलाईन टीम / जकार्ता :
इंडोनेशियाच्या जावामध्ये असलेल्या बालोंगान या ऑईल रिफायनरीला मोठी आग लागली आहे. या आगीत 5 जण गंभीररित्या भाजले असून, 15 जणांना किरकोळ स्वरुपाच्या भाजलेल्या जखमा आहेत. तर काही जण बेपत्ता आहेत. रिफायनरी जवळच्या 950 रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. स्थानिक वेळेनुसार रात्री 12 वाजून 45 मिनिटांनी ही आग लागली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
पेर्टामीनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक विद्यावटी म्हणाले, आग लागलेली रिफायनरी ही इंडोनेशियातील सर्वात मोठी रिफायनरी असून, ती सरकारी तेलकंपनी पेर्टामीनाच्या मालकीची आहे. रात्री 12.45 वाजता पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू असताना तेल साठवणूक करणाऱ्या टँकरपाशी ही आगली. अग्निशमनच्या जवानांनी काही तासातच ही आग आटोक्यात आणली. त्यामुळे रिफायनरीच्या तेलशुद्धीकरणाच्या क्षमतेला कोणताही धक्का पोहचला नाही. येत्या पाच दिवसात पुन्हा पुर्ण क्षमतेने काम सुरू होईल, असेही विद्यावटी यांनी म्हटले आहे.