माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या उद्घाटन
ऑनलाईन टीम / पिंपरी :
महिला सक्षमीकरण चळवळीतील सार्वजनिक उपक्रमात नावाजलेल्या इंद्रायणी थडी जत्रेत भरगच्च सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांबरोबरच प्रबोधन आणि जनजागृतीपर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ निर्माण करणारी ही जत्रा हक्काचे व्यासपीठ ठरेल, असे संयोजिका व शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा पुजा लांडगे यांनी सांगितले.
30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी पर्यत चालणाऱया इंद्रायणी थडीचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या गुरुवारी सकाळी 10 वाजता होणार आहे.
भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारील गावजत्रा मैदानावर आमदार लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि शिवांजली सखी मंचच्या पुढाकाराने भरविलेल्या इंद्रायणी थडी चे हे दुसरे वर्ष आहे. दि. 30, 31 जानेवारी आणि 1, 2 फेब्रुवारी 2020 असे चार दिवस, सकाळी 10 ते सायंकाळी 10 या वेळेत ही जत्रा नागरिकांसाठी खुली राहणार आहे. महिला सुरक्षा आणि सन्मान ही जत्रेची थीम आहे. यासह मनोरंजन, खेळ, ऐतिहासिक पौराणिक देखावे, खाद्यपदार्थ, महिला बचतगटांची उत्पादने, महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा याची प्रचिती देणारी इंद्रायणी थडी यावषी दुसरे पर्व साजरे करीत आहे, अशी माहिती शिवांजली सखी मंचच्या प्रमुख पूजा महेश लांडगे यांनी दिली.
जत्रेमध्ये आयोजिण्यात येणाऱया प्रमुख कार्यक्रमांचे स्वरूप पुढीलप्रमाणेः
दिवस पहिला : (गुरुवार, 30 जानेवारी 2020) : उद्घाटन समारंभ, चला हवा येऊ द्या, नृत्य कार्यक्रम, संगीत कार्यक्रम : ज्ञानेश्वर मेश्राम, भजन स्पर्धा, पारंपरिक नृत्य स्पर्धेची निवडचाचणी असे कार्यक्रम होतील.
दिवस दुसरा : (शुक्रवार, 31 जानेवारी 2020) : भजन स्पर्धा, नव्याने जत्रा भरते : सुधीर काळजे, पारंपरिक नृत्य स्पर्धेची अंतिम फेरी.
दिवस तिसरा : (1 फेब्रुवारी 2020) : अभंग बँड, पारंपरिक फॅशन शो, कीर्तन : निवृत्ती महाराज देशमुख, पाश्चात्य नृत्य स्पर्धा निवडचाचणी आणि अंतिम फेरी, स्वसंरक्षण कार्यक्रम.
दिवस चौथा : (2 फेब्रुवारी 2020) : पारंपरिक फॅशन शो, भजन स्पर्धा, ममिस इंद्रायणीफ फॅशन शो, डान्स स्पर्धा, मर्दानी खेळ, आदिवासी नृत्य, जत्रेचा समारोप कार्यक्रम.