नवी दिल्ली
ऑनलाइन ट्रव्हल क्षेत्रात कार्यरत असणाऱया इझ माय ट्रिपने अलीकडेच यलोबस कंपनीचे अधिग्रहण केले असल्याची माहिती आहे. यलोबस ही आंतरराष्ट्रीय स्तरावर बसची सुविधा उपलब्ध करणारी कंपनी आहे. सदरच्या अधिग्रहणाकरीता किती रक्कम मोजली गेली याबाबत मात्र कंपनीने खुलासा केलेला नाही. येणाऱया काळात या अधिग्रहणाचा इझ माय ट्रिपला फायदा होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.