वृत्तसंस्था / माद्रीद
इटलीच्या फुटबॉल संघाने नेशन्स लीग फायनल्समध्ये स्थान मिळविले आहे. बुधवारी झालेल्या सामन्यात इटलीने बोस्नियाचा 2-0 अशा गोलफरकाने पराभव केला. इटलीने या स्पर्धेत आता शेवटच्या चार संघामध्ये स्थान मिळविले आहे. त्यांनी आपली विजयी घोडदौड राखताना आतापर्यंत 22 सामन्यात पराभव पत्करलेला नाही.
बुधवारच्या सामन्यात 22 व्या मिनिटाला बेलोटी याने लॉरेंझोच्या पासवर इटलीचे खाते उघडले. इटलीचा दुसरा गोल मॅन्यूअल लोकाटेलीने दिलेल्या पासवर बेर्रादीने केला. या विजयानंतर इटली संघाने गट ए-1 मधून गुणतक्त्यात सहा सामन्यांतून 12 गुणांसह आघाडी घेतली आहे. बोस्नियाची पदावनती झाली असून त्यांनी फक्त दोन गुण मिळविले आहेत.