प्रतिनिधी/ बेळगाव
इनरव्हील क्लब बेळगाव, यांच्यावतीने सरकारी प्राथमिक मराठी शाळा मंडोळी येथे कोविड नियमांचे पालन करीत 200 पानी 200 वहय़ा शैक्षणिक मदत म्हणून देण्यात आल्या. शाळेच्यावतीने क्लबचे आभार मानण्यात आले. यावेळी अध्यक्षा डॉ. सुषमा शेट्टी, कीर्ती टेंबे, बेला शिवलकर, शालिनी चौगुले, लीना शहा, शिल्पा शहा, पुष्पांजली मुक्कण्णावर व मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.