प्रतिनिधी /बेळगाव
इनरव्हील क्लब ऑफ बेळगावतर्फे आराधना या गतीमंद मुलांच्या शाळेमध्ये बालदिनानिमित्त भेटवस्तु देण्यात आल्या. तसेच गोडसेवाडी येथील अंगणवाडी, टिळकवाडी येथील अंगणवाडी, केएलई हॉस्पिटलमधील बालकर्करोग विभाग या ठिकाणी सुध्दा खेळणी आणि चॉकलेटस् देण्यात आली. मुस्कान या उपक्रमांतर्गत इनरव्हील क्लब 317 च्या वसुंधरा कोळी यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम पार पडला. यावेळी क्लब अध्यक्षा डॉ. सुषमा शेट्टी, आयएसओ ममता जैन व क्लबच्या अन्य पदाधिकारी उपस्थित होत्या.