बेळगाव : कॉलेजरोड येथील मलबार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सोमवारी सरकारी पीयू कॉलेजच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली. यावेळी व्यासपिठावर खासदार मंगला अंगडी, उमेश हिरेमठ, आदर्श नूली. प्रतिभा कळ्ळीमठ, विजयकुमार शिंत्रे, स्टोअरहेड संवाद पी. आय. आदी उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते खानापूर, नेसरगी, सरदार कॉलेज, जैन कॉलेज, चिंतामणी कॉलेज आदी कॉलेजमधील पी. यू.च्या 145 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 5 हजार रूपये शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली. यावेळी बोलताना खासदार मंगला अंगडी म्हणाल्या वाटप करण्यात आलेली शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारी ठरेल. त्याबरोबर पुढील शिक्षणासाठी देखील शिष्यवृत्ती आधार ठरेल असे सांगितले. सरकारी पीयू कॉलेजच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून 7 लाख 25 हजार मलाबार चॅरिटेबल ट्रस्टने वाटप केले आहेत. स्वागत गीत संजना हिने सादर केले. याप्रसंगी असिस्टंट स्टोअर मॅनेजर सुरज अणवेकर, मार्केटींग मॅनेजर आनंद बुलबुले, चेतन कांबळे, अरूण कलघटकर, संतोष भांडीवाले यासह कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.