चौथ्या तिमाहीत नफा 6.3 टक्क्यांनी वाढला
नवी दिल्ली :
देशातील सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कार्यरत प्रसिद्ध इन्फोसिस कंपनी मागील आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत नफा कमाईत राहिली आहे. हा नफा 6.3 टक्क्मयांनी वधारुन 4,335 कोटी रुपयांवर राहिला आहे. कंपनीचे उत्पन्नही 8 टक्क्मयांनी वाढून 23,267 कोटी रुपयांच्या घरात पोहोचले आहे. परंतु कोरोनाच्या संकटामुळे आगामी 2020-21 वर्षातील व्यवसायातील नफा कमाई व अन्य आकडेवारी संदर्भातील कोणत्याही प्रकारचे भाकीत कंपनीने केलेले नाही.
कंपनीचा डिसेंबर तिमाहीत निव्वळ नफा 23.7 टक्क्मयांनी वधारुन 4,466 कोटी रुपयांवर राहिला होता तर मागील आर्थिक वर्षात याच कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा 4,078 कोटी रुपये राहिला आहे. शेअर बाजाराला माहिती देताना कंपनीने म्हटले आहे, की आम्ही व्यवसायावरील विविध परिणामांची गणनाही आंतरराष्ट्रीय वित्तीय प्रमाणाच्या नियमावलीनुसार करून मगच आकडे सादर केले आहेत.
वर्क फ्रॉर्म होमचा आधार
कंपनीने आपले 93 टक्के काम हे कर्मचाऱयांकडून घरातून करुन घेतले असल्याचे इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलिल पारेख यांनी सांगितले आहे. वर्क फ्रॉम होमचे सरकारचे आवाहन मानत कंपनीने काम केले आहे. तसेच बदलत्या परिस्थितीतही कंपनी आपली सेवा ग्राहकांना देण्याचा योग्य तो प्रयत्न करत असल्याचेही स्पष्ट केले आहे.