लॉकडाऊनच्या दुसऱया सत्रातही मागणी प्रभावीत
नवी दिल्ली :
आर्थिक व्यवहारांमध्ये कोरोनाच्या संकटामुळे काही प्रमाणात सवलत देण्यात येत आहे. त्यामध्ये विविध बँकांच्या हप्त्यांसोबत अन्य गोष्टींचा समावेश आहे. परंतु दुसऱया बाजूला मात्र देशातील उद्योगधंदे ठप्प असल्यामुळे वीज मागणीत मागील महिन्यापासून मोठी घट होत असल्याचे दिसून येत आहे. यात सोमवारी सकाळी ही वीज मागणी 3.15 टक्क्मयांनी घटून 1,23,000 मेगावॅट इतकी राहिली आहे.
या अगोदर पहिल्या सत्रातील घोषणा केलेल्या लॉकडाऊनमुळे वीज मागणीत वेगाने घट झाली होती. परंतु दुसऱया सत्रात आर्थिक चक्र सुरु ठेवण्यासाठी काही प्रमाणात उद्योगधंदे सुरु ठेवण्यात येणार असल्याचा अंदाज होता. त्यानंतर मात्र वीज मागणी वधारणार असल्याचे संकेत होते. परंतु असे काहीच झाले नसल्याचे दिसून आले आहे.
कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे विविध राज्यांमधील लॉकडाऊनचा कालावधी वाढविला असल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे पीटीआयच्या माहितीनुसार सोमवारी सकाळी 9.30 वाजेपर्यंतची जास्तीत जास्त वीज मागणी 1,23,000 मेगावॅट राहिली आहे. मागील आठवडय़ात हा आकडा 1,27,000 मेगावॅट इतका होता. तसेच येणाऱया काही दिवसांमध्येही वीज मागणीत बदल होण्याचा अंदाज मांडला आहे.
तापमानामधील घसरणीच्या कारणामुळे वीज मागणीत जी वाढ अपेक्षित होती ती काही झालेली नाही तर हीच मागणी मागील एप्रिलमध्ये 1,76,810 मेगावॅट इतकी राहिली आहे. तसेच फेब्रुवारी 2020 मध्ये वीज बिलांची थकबाकी 92,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट केले आहे.