ऑनलाईन टीम / न्यूयॉर्क :
इराक आणि सीरियात इसिस या दहशतवादी संघटनेचे 10 हजारांहून अधिक दहशतवादी सक्रिय आहेत, असा दावा संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादविरोधी विभागाचे प्रमुख व्लादीमिर वोरोन्कोव्ह यांनी केला आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत बोलताना वोरोन्कोव्ह म्हणाले, यंदा इसिसकडून इराक आणि सीरियासह त्याच्याशी संलग्न प्रदेशात हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. इराक आणि सीरियात दहा हजारांहून अधिक संख्येने सक्रिय असलेले हे दहशतवादी छोट्या-छोट्या गटांमधून मुक्तपणे दोन्ही देशात ये-जा करत आहेत.
कोरोनामुळे करण्यात आलेले लॉकडाऊन आणि कडक निर्बंध यामुळे या दहशतवाद्यांनी सायबर हल्ल्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे, असेही वोरोन्कोव्ह यांनी सांगितले.