तेहरान
इराणच्या घटना विभागाने सोमवारी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी 18 जून ही तारीख निश्चित केली आहे. पुढील वर्षी होणाऱया या निवडणुकीत हसन रुहानी यांचा उत्तराधिकारी निवडला जाणार आहे. रुहानी हे 4 वर्षांचे दोन कार्यकाळ पूर्ण करणार आहेत. गार्डियन कौन्सिलने तारखेला मंजुरी दिल्याची माहिती इराणच्या निवडणूक मुख्यालयाचे प्रमुख जमाल ओर्फ यांनी दिली आहे. उमेदवार एप्रिलमध्ये अर्ज दाखल करू शकतील. तर जूनच्या प्रारंभी उमेदवारांची अंतिम यादी प्रकाशित केली जाणार आहे.
इराणच्या कायद्यांतर्गत विद्यमान राष्ट्रपती सलग तिसऱया कार्यकाळासाठी निवडणूक लढवू शकत नाहीत. 2013 मध्ये रुहानी सर्वप्रथम राष्ट्रपतिपदावर निवडून आले होते. 4 वर्षांनी ते पुन्हा विजयी झाले होते.