वृत्तसंस्था / नवी दिल्ली
इलेक्ट्रीक स्कुटर व मोटारसायकलींच्या किंमती लवकरच कमी केल्या जाणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. येणाऱया काळात या गाडय़ांच्या किंमती 15 हजार रुपयांपर्यंत कमी होण्याची शक्मयता सांगितली जात आहे.
सध्याच्या फेम- टू (एफएएमई) योजनेंतर्गत वाहनांवरील सवलत वाढवून दिली जाणार आहे. प्रति केडब्ल्यूएचच्या इलेक्ट्रीक दुचाकीवर मिळणारी सवलत आता 15 हजार रुपये इतकी करण्यात (यापूर्वी 10 हजार) आली आहे. या माध्यमातून इलेक्ट्रीक दुचाकींच्या विक्री वाढीला प्रोत्साहन देण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे.
सध्याच्या साध्या दुचाकींच्या किंमतीच्या तुलनेत इलेक्ट्रीक दुचाकी या 20 हजार रुपये इतक्मया महाग आहेत. म्हणूनच सरकारने सवलत वाढवून देत या गाडय़ा स्वस्त करण्यावर भर दिला आहे. जेणेकरून विक्रीत वाढ व्हावी हा त्यामागे सरकारचा उद्देश आहे. याने वाढत्या प्रदुषणात घट होण्यास मदत होणार असल्याचे सरकारने म्हटले आहे.