कियारा आडवाणीने शेअर केला करियरचा प्रवास
अभिनेत्री कियारा आडवाणी बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक ओ. तिने 13 जून 2014 मध्ये फगली या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल टाकले होते. त्यानंतर कबीर सिंग, लस्ट स्टोरीज, धोनी समवेत अनेक चित्रपटांमध्ये कियाराने स्वतःच्या व्यक्तिरेखांद्वारे प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळविले आहे. चित्रपटसृष्टीत 7 वर्षे पूर्ण केल्यावर कियाराने स्वतःच्या फिल्मी व्यक्तिरेखांची छायाचित्रे प्रसारित करत आनंद व्यक्त केला आहे.
फगली चित्रपटात कियाराने देवीची भूमिका साकारली होती, पण यातून तिला विशेष ओळख प्राप्त झाली नव्हती. 2016 मध्ये एमएस धोनी चित्रपटात कियाराने सुशांत सिंग राजपूतसोबत काम केले होते. 2017 मध्ये प्रदर्शित मशीन चित्रपटातही कियाराने भूमिका साकाली होती. 2018 मध्ये नेटफ्लिक्स मुव्ही लस्ट स्टोरीजमधील तिच्या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांकडून दाद मिळाली होती. दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूसोबत तिने ‘भारत अने नेनू’ चित्रपटात काम केले होते.
2019 मध्ये कलंक, कबीर सिंग आणि गूड न्यूज यासारख्या बिगबजेट चित्रपटांमधून ती झळकली. कबीर सिंग चित्रपटातील प्रीति या तिच्या व्यक्तिरेखेला मोठी लोकप्रियता मिळाली. 2020 मधील गिल्टी या नेटफ्लिक्सच्या चित्रपटात कियाराने वेगळय़ा प्रकारची भूमिका साकारली होती. त्यानंतर लक्ष्मी तसेच इंदू की जवानी चित्रपटातील तिची भूमिका लक्षणीय होती.