ऑनलाईन टीम : जेरुसलेम :
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे इस्राईलमध्ये तीन आठवड्यांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. येत्या शुक्रवारपासून या लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात येईल, असे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
नेतान्याहू यांनी म्हटले आहे की, कोरोना विषाणूला रोखणे आणि संसर्गाची संख्या कमी करणे हे आमचे लक्ष्य आहे. त्यासाठी तीन आठवड्यांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी केले जाऊ शकते, पण त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि रोजगारावर गंभीर परिणाम होतो. त्याची किंमत आम्हाला मोजावी लागेल.
तीन आठवड्यांच्या या लॉकडाऊन काळात 10 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व व्यवहार पूर्णपणे बंद राहणार आहेत.