अभिनेत्री ऋतांभरी चक्रवर्ती
प्रतिनिधी / पणजी
ईश्वराची कोणतीही निर्मिती केवळ मासिक पाळीमुळे अशुद्ध ठरत याबद्दल ‘ब्रह्मा जाने गोपोन कोम्मोटी’ या बंगाली चित्रपटात सांगण्यात आले आहे. आंचिमसाठी आपल्या चित्रपटाची निवड झाली हा आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. चित्रपटाचा विषय प्रत्येकाला आपलासा वाटणारा आणि मनोरंजक आहे. यामध्ये गंभीर विषयावर भाष्य करण्यात आले असले तरी तो आनंददायी आहे असे मत ‘ब्रह्मा जाने गोपोन कोम्मोटी’ या चित्रपटाच्या अभिनेत्री ऋतांभरी चक्रवर्ती यांनी 51व्या आंचिममध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केली.
यावेळी चित्रपटाच्या दिग्दर्शिका अरित्रा मुखर्जी, निर्माता शिबोप्रसाद मुखर्जीण् पटकथाकार सम्राज्ञी बंडोपाध्याय, लेखिका झिनिया सेन आणि प्रमुख अभिनेते सोहम मुजुमदार उपस्थित होते. महिलांना सर्वत्र भेदभावाला सामोरे जावे लागते. पुजारी असलेल्या महिलेची ही कथा आहे. स्त्रियांच्या मासिक पाळीला निषिद्ध मानण्याबाबतची समजूत नष्ट करण्याचा लेखिकेचा उद्देश असून या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारायला मिळाली हा आपला सन्मान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
शबरी ही व्याख्याती, कलाकार आणि मुख्य म्हणजे पुजारी आहे. लग्नानंतर तिच्या जीवनातले अनेक बदल स्वीकारण्यासाठी तिला कसे झगडावे लागले आणि पुजारी म्हणून विधी सुरू ठेवण्यासाठीचे तिचे प्रयत्न या चित्रपटात विनोदी ढंगाने मांडण्यात आले आहे. भारतीय समाजात मासिक पाळीला अद्यापही कसे निषिद्ध मानण्यात येते याचे दर्शन घडविण्यावर चित्रपटाचा प्रामुख्याने रोख आहे. महिलांना प्रत्येक वेळी सुटकेची गरज नसते असे पटकथा लेखिका झिनिया सेन यांनी यावेळी सांगितले. पुरूषांनी एकत्रितपणे पाऊले उचलले नाहीतर स्त्राr पुरूष समान असलेल्या समाजाची निर्मिती आपण करू शकणार नाही असे मत चित्रपटात विक्रमादित्य ही नायकाची भूमिका साकारणाऱया सोहम मुजुमदार यांनी व्यक्त केले.