वार्ताहर /उचगाव
उचगाव येथील विठ्ठल-रखुमाई गणेश मंदिरामध्ये सकाळी पहाटे विठ्ठलाच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. मंगळवारी सकाळी 10 वाजता उचगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी तब्बल तीन तास भजनाचा आनंद लुटला. यावेळी त्यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाई, गणेश मूर्तीची विधिपूर्वक पूजा केली. त्यानंतर त्यांनी गळय़ामध्ये टाळ घेऊन दोन तास भजनामध्ये आपला सहभाग दाखविला. ज्ञानेश्वरी मंडळातर्फे श्रीफळ, पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले.
यावेळी ग्रा. पं. चे अध्यक्ष जावेद जमादार, उपाध्यक्षा मथुरा तेरसे, एपीएमसीचे अध्यक्ष युवराज कदम, सदस्य एल. डी. चौगुले, बाळकृष्णा तेरसे, गजानन नाईक, यादो कांबळे, बंटी पावशे, हनुमंत बुवा, अनुसया कोलकार, रामा कदम, संभाजी कदम, मनोहर कदम, बी. एस. होनगेकर, लक्ष्मण होनगेकर व भजनी मंडळाचे सदस्य उपस्थित होते.