ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडात शेतकऱ्यांची ऊस तोडणी सुरू असल्याने तेथील शेतकरी उद्या होणाऱ्या ‘चक्का जाम’ आंदोलनात सहभागी होणार नाहीत. त्यांना जेव्हा दिल्लीत बोलावले जाईल, तेव्हाच ते दिल्लीत दाखल होतील, असे भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष राकेश टिकैत यांनी स्पष्ट केले.
उद्या उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड वगळता देशभरात राष्ट्रीय आणि राज्यमार्गावर दुपारी 12 ते 3 यावेळेत ‘चक्का जाम’ आंदोलन होईल. दरम्यान, 26 जानेवारीला दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सर्व बॉर्डरवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.