आज कागदपत्रांसह हजर राहण्याची सूचना
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांना दिल्ली वक्फ बोर्डातील कथित अनियमिततेशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहण्यास सांगितले आहे. सोमवार, 29 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजण्यापूर्वी ईडीच्या कार्यालयात कागदपत्रांसह हजर राहण्याची सूचना करण्यात आली आहे. यादरम्यान मनी लाँड्रिंग प्रतिबंधच्या तरतुदींनुसार त्यांची जबानी नोंदवली जाणार आहे.
दिल्ली न्यायालयाने शनिवारी समन्सकडे दुर्लक्ष केल्याबद्दल अंमलबजावणी संचालनालयाने दाखल केलेल्या खटल्यात अमानतुल्ला यांना जामीन मंजूर केला. अतिरिक्त मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट दिव्या मल्होत्रा यांनी अमानतुल्ला यांना न्यायालयात हजर झाल्यानंतर 15,000 ऊपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्मयावर जामीन देत दिलासा दिला. अमानतुल्ला यांच्या बचावार्थ आम आदमी पक्षाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. आमदार अमानतुल्ला यांच्याविऊद्धचा ईडीचा खटला खोटा असून पक्ष त्यांच्या पाठिशी उभा आहे, असे आपच्या नेत्या आणि पॅबिनेट मंत्री आतिशी यांनी सांगितले होते.
अमानतुल्ला आणि त्यांच्या साथीदारांविऊद्ध मनी लाँड्रिंगचा खटला सीबीआय एफआयआर आणि दिल्ली पोलिसांच्या तीन तक्रारींशी संबंधित आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात आप आमदाराच्या अटकपूर्व जामीन अर्जावर विचार करण्यास नकार दिल्यानंतर अमानतुल्ला खान 18 एप्रिल रोजी एजन्सीसमोर हजर झाले. त्यादरम्यान, ईडी कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना वक्फ बोर्डाचे अध्यक्ष असताना आपण नियमांचे पालन केल्याचे म्हटले होते.