ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. मंगळवारी उत्तराखंडात 78 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 22 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 3686 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य सचिव युगल किशोर पंत यांनी दिली.
तेेेे म्हणााले, काल आढळलेल्या रुग्णांमध्ये ऊधमसिंह नगरमध्ये 33, हरिद्वार 22, देहरादून 12, पौडी 3, टिहरी 5 आणि उत्तरकाशी मधील दोघांचा समावेश आहे.
उत्तराखंड राज्यात आतापर्यंत 2867 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 77. 78 टक्के इतके आहे. तर सध्या 736 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर आतापर्यंत 50 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असे पंत यांनी यावेळी स्पष्ट केले.