- मृतांच्या संख्येने ओलांडला 5 हजारांचा आकडा
ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडात कोरोनाची दुसरी लाट अधिक घातक बनत चालली आहे. प्रदेशात मागील 24 तासात 3 हजार 719 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. तर 136 रुग्णांचा मृत्यू झाला. तर कालच्या 3 हजार 647 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे प्रदेशात एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 91 हजार 005 इतकीझाली आहे. यातील 2 लाख 02 हजार 177 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील 24 तासात 25,944 नमुने निगेटिव्ह आले आहेत. काल देहरादून जिल्ह्यात 752 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर उधमसिंह नगर 410, हरिद्वारमध्ये 464, नैनिताल 106, उत्तरकाशीमध्ये 286, पौडीमध्ये 205, टिहरी 229, अल्मोडा 200, रुद्रप्रयाग 226, चमोली 449, चंपावत 153, पिथोरागडमध्येे 180 आणि बागेश्वर जिल्ह्यात 46 रुग्ण आढळून आले आहेत.
- लस उपलब्ध नसल्याने लसीकरण मोहीमेला ब्रेक
प्रदेशात आतापर्यंत 5,034 जणांचा मृत्यू झाला आहे. सद्य स्थितीत प्रदेशात 78, 608 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, प्रदेशातील लस संपल्या असल्याने लसीकरण मोहिमेला ब्रेक लागला आहे. केंद्राकडून लस मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 45 वर्षांवरील नागरिकांना पहिला आणि दुसरा डोस देण्यासाठी लस उपलब्ध नाही आहे. केंद्राकडून अजूनही 1.37 लाख लस मिळणे बाकी आहेत.