ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. उत्तराखंडात मागील 24 तासात सर्वाधिक म्हणजेच 1,637 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. या सोबतच कोरोना रुग्णांनी 31 हजारांचा टप्पा गाठला आहे. तर राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 31 हजार 973 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य सचिव युगल किशोर पंत यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, काल 9,088 रिपोर्ट निगेटिव्ह आले. काल आढळलेल्या 1,637 रुग्णांमध्ये अलमोरा जिल्ह्यात 16, बागेश्र्वर 13, चमोली 07, चंपावत 32, देहरादून 623, हरिद्वार 318, नैनिताल 211, पौरी गरवाल 57, पिथोरगड 34, रुद्र प्रयाग 12,तेहरी गरवाल 27, यू एस नगरमधील 240 आणि उत्तर काशीमधील 47 जणांचा समावेश आहे.
- 10,394 रुग्णांवर उपचार सुरू
रविवारी 1009 जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर आतापर्यंत प्रदेशातील 21,040 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 65.81 टक्के इतके आहे. तर सध्या 10 हजार 397 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर आतापर्यंत 414 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असे पंत यांनी यावेळी स्पष्ट केले.