ऑनलाईन टिम / डेहराडून
उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे 17,500 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. या उद्घाटन कार्यक्रमात 3,420 कोटी रुपयांच्या सहा प्रकल्पांचे उद्घाटन आणि 14,127 कोटी रुपयांच्या अन्य 17 प्रकल्पांची पायाभरणी यांचा समावेश आहे.
या प्रकल्पामध्ये ५,७४७ कोटी रुपयांचा लखवार बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प, ५०० कोटी रुपयांचे कुमाऊँसाठी एम्स उपग्रह केंद्र, मुरादाबाद-काशीपूर चौपदरी रस्ता, नेपाळशी सुधारित रस्ते संपर्क आणि काशीपूरमधील अरोमा पार्क हे प्रमुख प्रकल्प आहेत.