सांख्यिकी कार्यालयाकडून आकडेवारी सादर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्याअगोदर सरकारला दिलासा देणारी बाब मिळाली आहे. ती म्हणजे उत्पादन क्षेत्रात आता तेजीचे वारे वाहत असल्याचे पहावयास मिळत आहे. औद्योगिक उत्पादन 1.8 टक्क्यांनी वाढले आहे. ही स्थिती मागील तीन महिन्यांच्या घसरणीनंतर पहावयास मिळाली असल्याने मोठी दिलासा देणारी बाब ठरली असून या संदर्भातील शुक्रवारी सरकारने आकडेवारी सादर केली आहे.
नोव्हेंबरमध्ये उत्पादन क्षेत्रातील वाढीचा दर 2.7 टक्क्यांवर राहिला आहे. तर हाच एक वर्षापूर्वी याच महिन्यात 0.7 टक्क्यांनी घसरला होता. तर 2018 च्या नोव्हेंबरला वीज उत्पादन 5.1 टक्क्यांनी वधारले होते. तर नोव्हेंबर 2019 रोजी मात्र 5 टक्क्यांनी घसरले आहे. अशी माहिती राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीतून सांगितले आहे.
औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक एक वर्षापूर्वी नोव्हेंबर 2018 रोजी 0.2 टक्क्यांनी वधारला होता. तर एक महिन्यापूर्वी ऑक्टोबरमध्ये 3.8 टक्क्यांनी घसरण नोंदवली होती. ऑगस्ट ते ऑक्टोबर 2019 पर्यंत औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक सलग घसरला होता.