तीन तालुक्मयांची उद्दिष्टपूर्ती , अजूनही अकरा तालुक्मयांमध्ये जोमात कामे
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय उद्योग खात्री योजना अनेकांना लाभदायी ठरत आहे. दररोज 80 हजार कामगारांना काम देण्यात येत आहेत. सध्या मार्च एन्डचा धसका साऱयांनी घेतला असून बेळगाव जिह्यातही उद्योग खात्रीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी धडपड सुरू आहे. जिह्यातील तीन तालुक्मयांनी आपले उद्दिष्ट पूर्ण केले असून अजूनही 11 तालुके आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कार्यरत आहेत. बेळगाव तालुक्मयाचेही उद्दिष्ट 81.09 इतके असून लवकरच ते पूर्ण करण्यात येणार आहे.
जिह्यातील चिकोडी, हुक्केरी आणि रामदुर्ग या तालुक्मयांनी आपले उद्दिष्ट पूर्ण केले असून उर्वरित तालुकेही उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्नशील आहेत. उद्योग खात्रीमुळे अनेकांना रोजगार उपलब्ध होत आहे. बेळगाव जिह्यातील 79 हजार 778 कामगारांना मंगळवारी काम देण्यात आले. हा आकडा एक लाखावर नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
उद्योग खात्रीतील योजनेंतर्गत बेळगाव तालुक्यासह जिह्यात आता मोठय़ा प्रमाणात काम उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यासाठी विविध विकास कामांना चालना देण्यात आली. गावात काम नसले तरी वनविभागाच्या माध्यमातून बेरोजगारांना कामे देण्यात येत आहेत. त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे. बेळगाव जिल्हा हा उद्योग खात्रीतून कामे देण्यासाठी राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. यावषी पुरामुळे प्रत्येक गावात मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यासाठीही उद्योग खात्रीतून चालना देण्यात आली आहे. परिणामी याकडे गांभीर्याने लक्ष देवून कामे करण्यात येत आहे.
सध्या कामांची गती वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. बेळगाव तालुक्मयात उद्योग खात्रीची कामे मोठय़ा प्रमाणात चालतात. मात्र अजूनही उद्दिष्ट पूर्तीसाठी धडपड सुरू आहे. बेळगाव तालुक्मयात मंगळवारी 12 हजार 521 कामगारांनी काम केले..
उद्योग खात्रीतून झालेली तालुकानिहाय कामांची टक्केवारी
तालुका | पूर्ण झालेली टक्केवारी |
अथणी | 83.43 |
बेळगाव | 81.09 |
बैलहोंगल | 76.46 |
चिकोडी | 101.72 |
गोकाक | 77.95 |
हुक्केरी | 111.87 |
कागवाड | 56.99 |
खानापूर | 63.68 |
कित्तूर | 77.09 |
मुडलगी | 85.98 |
निपाणी | 67.82 |
रामदुर्ग | 110.43 |
रायबाग | 81.32 |
सौंदत्ती | 83.54 |
एकूण | 85.83 |