प्रतिनिधी / बेळगाव
उन्नती संस्थेच्या ‘परंपरा’ या महिला विभागाने 10 वर्षे पूर्ण केली आहेत. या 10 व्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेने उद्यमबाग येथे ‘कॉमन फॅसिलिटी सेंटर’ सुरू केले आहे. विशेष म्हणजे कर्नाटक सरकारच्या औद्योगिक खात्याने हे सेंटर मंजूर केले आहे. डीआयसीचे सहसंचालक दोड्डबसवराजू यांनी या सेंटरचे उद्घाटन केले.
उन्नतीच्या अध्यक्षा प्रिया पुराणिक यांनी सर्वांचे स्वागत केले. उन्नतीतर्फे महिलांना विविध उद्योग व हस्तकलेचे प्रशिक्षण दिले जाते, कार्यशाळा घेतल्या जातात, प्रदर्शने भरविली जातात, गरजू महिलांना काम देऊन स्वावलंबी बनविले जाते, असे त्या म्हणाल्या. दोड्डबसवराजू यांनी सदर सेंटरचा महिलांनी उपयोग करून घ्यावा, असे सांगितले. शामला यांनी आभार मानले.
यावेळी सदस्या शामला, आनंदी, लता, वीणा, मधू, शांता, सुप्रिया, दीपा, पार्वती आदी उपस्थित होत्या.