उन्हाच्या झळांपासून बचाव करण्याकरिता चक्क थंडगार कलिंगड चे कवच परिधान करून प्रवास करणारा अवलिया (छाया -तवरेज बागवान)
सातारा : सध्या उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. यातच वाहतुकीला निर्बंध आले असल्याने काही ना गरजेसाठी पायीच प्रवास करावा लागत आहे. या उन्हापासून बचावाकरिता नागरिकांकडून विविध फंडे आजमवण्यात येतात. काहींनी आपल्या छत्री बाहेर काढल्या आहेत तर सर्रास महिलावर्ग स्टोलचा वापर करत आहेत. यातच चक्क एका अवलियाने उन्हापासून बचाव करण्यासाठी आपल्या डोक्याला हेल्मेट एवजी थंडगार कलिंगड चे कवच डोक्यावर परिधान केले होते.
उन्हाच्या झळा पासून बचाव करण्याकरिता लढवलेली ही शक्कल पाहून येथे जाणारा येणाया सर्वच नागरिकांचे लक्ष वेधीत होता.