पासपोर्ट परत करण्याचा न्यायालयाचा आदेश
वृत्तसंस्था/ पाटणा
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव हे उपचारासाठी सिंगापूरला जाऊ शकणार आहेत. चारा घोटाळय़ात दोषी ठरलेल्या लालूप्रसाद यादव यांच्या अर्जावर शुक्रवारी सीबीआय न्यायालयात सुनावणी झाली आहे. उपचारासाठी सिंगापूरला जाण्याकरता पासपोर्ट प्रदान करण्याची विनंती लालू यादवांच्या वतीने करण्यात आली होती. तसेच उपचारासाठी 2 महिन्यांचा कालावधी देण्यात यावा असेही अर्जात म्हटले गेले होते. न्यायालयाने पासपोर्ट जारी करण्याचा आदेश दिला आहे. तर जामीन अटींनुसार लालूंनी स्वतःचा पासपोर्ट न्यायालयात जमा केला होता.