प्रतिनिधी /बेळगाव
महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याकरिता शनिवारी मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती. शनिवारपर्यंत एकूण 85 अर्ज दाखल झाले असून अद्याप काही वॉर्डांमध्ये एकही अर्ज दाखल करण्यात आलेले नाहीत. सोमवार दि. 23 रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने निवडणूक कार्यालयात गर्दी होण्याची शक्मयता आहे.
महापालिकेच्या 58 वॉर्डांकरिता निवडणुकीसाठी प्रारंभी 9 अर्ज दाखल झाले होते. शनिवारी 76 अर्ज दाखल झाल्याने आतापर्यंत 85 अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत 600 हून अधिक अर्ज इच्छुकांनी घेतले आहेत. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात अर्ज दाखल होण्याची शक्मयता आहे. इच्छुक उमेदवारांना विविध कागदपत्रे मिळत नसल्याने नागरिकांची धावपळ सुरू आहे. कागदपत्रे तसेच सूचकांचे ‘नो डय़ूज’ प्रमाणपत्र आणि मतदार यादीबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे शुक्रवारी मनपा कार्यालयात कागदपत्रे घेण्यासाठी गर्दी झाली होती. शनिवारपर्यंत 58 पैकी 41 वॉर्डांकरिता 85 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून 17वॉर्डांमध्ये अद्याप एकही अर्ज दाखल करण्यात आला नाही. मात्र सर्वाधिक सहा उमेदवारी अर्ज वॉर्ड क्रमांक 4 मधून आणि वॉर्ड क्रमांक 8 मध्ये पाच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. सोमवार दि. 23 रोजी दुपारी 3 वाजेपर्यत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने गर्दी होण्याची शक्मयता आहे.