वार्ताहर /उसगांव
उसगांव पंचायतीच्या उपसरपंचपदी गुरुदास गावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. काल मंगळवारी झालेल्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत त्यांचा एकमेव अर्ज आल्याने तो ग्राह्य़ धरुन त्यांच्या नावाची घोषाणा करण्यात आली.
सरपंच अस्मिता गावडे यांच्यासह पंचसदस्य रामनाथ डांगी, तुळशीदास प्रभू, दिनेश तारी, संगीता गांवकर, विलीयम मास्कारेन्हास, सीमा मास्कारेन्हास, रेखा वेलिंगकर व गुरुदास गावडे हे अकरापैकी नऊ पंचसदस्य यावेळी उपस्थित होते. फोंडा गट विकास कार्यालयातील विस्तार अधिकारी रवींद्र नाईक यांनी निर्वाचन अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांना पंचायत सचिव प्रसाद शेट यांनी साहाय्य केले. रामनाथ डांगी यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते.