फळविक्रेताच निघाला कोरोनाबाधित
प्रतिनिधी / उस्मानाबाद
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत एकही कोरोनाबाधित रूग्ण नव्हता जे तीन होते त्यांचेही रिर्पार्ट निगेव्टीव्ह आल्यामुळे उसमानाबाद जिल्हा हा ग्रीन झोनमध्ये होता. परंतु परंडा येथे कोरोनाचा एक रूग्ण सापडला असून त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती उसमानाबादचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली.
सदर रूग्ण माढा, नवी मुंबई, वाशी, करमाळा येथे खरबूज व टरबूज अशी फळे विकत होता. तसेच तो स्वतः वाहनचालक होता. तो सध्या सरणवाडी येथे राहत असून त्याच्यावर उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात तब्बल 37 दिवसानंतर कोरोना रूग्ण सापडल्याने पुन्हा एकदा प्रशासकीय यंत्रणेसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.