वृत्तसंस्था/ ऍडलेड
ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेपूर्वी येथे झालेल्या सरावाच्या ऍडलेड आंतरराष्ट्रीय महिलांच्या टेनिस स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या टॉप सीडेड ऍस्ले बार्टीने एकेरीचे जेतेपद पटकाविले.
या स्पर्धेतील अंतिम सामन्यात बार्टीने 19 वर्षीय युक्रेनच्या येस्ट्रीमेस्काचा 6-2, 7-5 अशा सरळ सेटस्मध्ये पराभव केला. या सामन्यातील पहिला सेट बार्टीने 30 मिनिटांच्या कालावधीत जिंकला. मात्र दुसऱया सेटमध्ये तिला प्रतिस्पर्ध्यांकडून कडवी लढत मिळाली. येत्या सोमवारपासून मेलबोर्न येथे ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेला प्रारंभ होत आहे. बार्टीने गेल्यावर्षी प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा जिंकली होती. 2019 अखेरीस महिला एकेरीच्या मानांकनात बार्टीने आपले अग्रस्थान कायम राखले होते.