ऍमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल 4 ऑक्टोबरपासून
वृत्तसंस्था/ बेंगळूर
ऍमेझॉनने द ग्रेट इंडियन फेस्टिव्हल (जीआयएफ)ची घोषणा केली आहे. याचा प्रारंभ येत्या 4 ऑक्टोबरला होणार आहे. ऍमेझॉनचे प्राईम मेंबर्सला सर्वात आधी प्राधान्य असणार आहे. यासोबतच ग्रेट इंडियन फेस्टिव्हलच्या दरम्यान एचडीएफसी बँक आणि डेबिट कार्ड तसेच इएमआय व्यवहारांवर जवळपास 10 टक्क्यांपर्यंत सवलत ग्राहकांना खरेदीवर मिळणार असल्याची माहिती आहे.
सेलमध्ये ऍमेझॉनच्या प्लॅटफॉर्मवर तब्बल 75000 पेक्षा अधिक स्थानिक दुकानांचा समावेश राहणार आहे. सेलच्या दरम्यान किराणा, फॅशन ऍण्ड ब्युटी, स्मार्टफोन, अप्लायंसेस आणि टीव्ही, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स तसेच अन्य श्रेणीमधील 1000पेक्षा अधिकची नवीन उत्पादने सादर होणार असल्याचे ऍमेझॉनने स्पष्ट केले आहे. विशेष बाब म्हणजे ग्राहकांना हिंदीमधील व्हॉईस शॉपिंगचा अनुभव घेता येणार आहे.
फ्लिपकार्टचा सेल 7 ऑक्टोबरपासून
ऑनलाइन इ कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी फ्लिपकार्टचा बिग बिलीयन डेज हा वार्षिक सेल 7 ते 12 ऑक्टोबरदरम्यान आयोजीत करण्यात आला आहे. पे लेटरअंतर्गतची क्रेडिटची मर्यादा कंपनीने 10 हजारवरून 70 हजारवर केली आहे.