सॅन फ्रान्सिस्कोः ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपनी ऍमेझॉन यांनी आपल्या बहुप्रतिक्षित प्राईम डे सेलच्या तारखेची घोषणा नुकतीच केली आहे. ऍमेझॉनचा प्राईम डे सेल 13 आणि 14 ऑक्टोबर रोजी सादर होणार आहे. यावषीच्या या विक्री सोहळय़ामध्ये खूप साऱया सवलतीच्या योजना ग्राहकांसाठी असणार असल्याचे ऍमेझॉनच्या सूत्रांकडून समजते. आता तारीख जाहीर झाल्याने तरूणांकडून आवडती वस्तु घेण्यासाठीच्या तयारीला अंतिम स्वरूप दिले जाईल. मागच्या वषी कंपनीने हा सेल जुलैच्या मध्यावर आयोजित केला होता. परंतु यंदा मात्र कोरोनामुळे सेल ऑक्टोबरमध्ये घेण्यात आला आहे.
छोटय़ा व्यावसायिकांसाठी लाभ मिळवून देण्यासाठीच प्राईम डेचे आयोजन करण्यात आल्याचे कंपनीने सांगितले.