बेंगळूर
अमेरिकेतील कंपनी वेरीझॉन कम्युनिकेशन्स इंक आणि ऍमेझॉन या दोन कंपन्या भारतातील व्होडाफोन-आयडिया कंपनीत 4 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या माहितीनंतर व्होडाफोनच्या समभागांमध्ये 10 टक्क्यांची शेअरबाजारात तेजी दिसून आली. व्होडाफोन-आयडियामध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भात वरील दोन्ही कंपन्यांची प्राथमिक स्तरावर चर्चा सुरु असून याबाबतची अधिक माहिती एक-दोन दिवसात दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.