बेळगाव : एंजल फौंडेशनतर्फे एका अगतिक वृद्ध महिलेला मदतीचा हात देऊन तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. खानापूरच्या बुऊड गल्ली येथे एक महिला कित्येक दिवसांपासून एकाच ठिकाणी असाहाय्यपणे बसून होती. तेथून जाणाऱ्या एंजल फौंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा मीनाताई बेनके यांनी त्या वृद्धेची विचारपूस केली. सदर वृद्ध महिला आजारी असल्याने त्यांनी तिला सरकारी
हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सध्या त्या महिलेवर उपचार सुरू असून तिची प्रकृती सुधारत आहे. उपचारानंतर तिला वृद्धाश्रमात दाखल करण्यात येणार आहे. यावेळी मीनाताई यांना मिनल पवार, प्रवीण मुतगेकर, आकाश शहापूरकर, प्रज्ञा शिंदे, भारती बुडवी, अवधूत तुडयेकर, सायमंड डिसोझा यांचे सहकार्य लाभले.