ऑनलाईन टीम
एकतर्फी प्रेम प्रकरणातून एका अल्पवयीन मुलीची तरुणाने हत्या केल्याची खळबळजनक घटना अमरावतीच्या धामणगाव शहरात घडली आहे. महाविद्यालयात १२ वीच्या वर्गात शिकणाऱ्या १७ वर्षीय तुरुणीची हत्या करून तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला. यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर तरुणाला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तरुणी धामणगाव येथील सेफला हायस्कूलमध्ये १२ वीत शिकत असून आज ११.१५ वा. च्या सुमारास शाळेत जाताना ही घटना घडली.
जुना धामणगाव परिसरात राहणाऱ्या तरुणीला महाविद्यालयात जाताना तरुणाने गार्डनमध्ये बोलावले होते. ती त्या ठिकाणी आल्यानंतर काही वेळातच तरुणाने तिच्यावर चाकूने सपासप वार केले. यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर तरुणाने स्वत:च्या पोटातही चाकू मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.