साहित्यः
1 चमचा तेल, अर्धा चमचा जिरं, 1 कांदा बारीक चिरून, 1 चमचा आलं-लसूण पेस्ट, 1 मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून, 2 वाफवलेली अंडी, 4 कढीपत्ता पाने, अर्धा चमचा गरम मसाला पावडर, पाव चमचा लाल तिखट पावडर, पाव चमचा हळद पावडर, चवीपुरते मीठ
कृतीः
प्रथम वाफवलेल्या अंडय़ाचे कवच काढून त्याचे सुरीच्या सहाय्याने मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावेत. पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरं टाकून परतवावे. नंतर त्यात कांदा व थोडेसे मीठ टाकून कांदा गुलाबी रंगावर परतवून घ्यावा. आता त्यात आलं-लसूण पेस्ट व कढीपत्ता टाकून मिश्रण परतवावे. नंतर टोमॅटो टाकून मऊसर शिजवून घ्यावा. नंतर त्यात अंडय़ाचे तुकडे, लाल तिखट पावडर, गरम मसाला पावडर, हळद पावडर आणि वाटल्यास मीठ टाकून मिश्रण तीन ते चार मिनिटे परतवून घ्यावे. मिश्रण छान एकजीव झाले की आच बंद करावी. आता तयार एग्ग रोस्ट तयार भातासोबत अथवा बेड अथवा चपातीसोबत कोथिंबीरीने सजवून खाण्यास द्यावे.
टीपः यामध्ये वाटल्यास थोडेसे पाणी वापरू शकता.