नवी दिल्ली
सार्वजनिक क्षेत्रात प्रमुख वीज कंपनी म्हणून कार्यरत असणारी एनटीपीसीने वर्ष 2027 पर्यंत 35,000 मेगावॅट नवीन ऊर्जा क्षमता प्राप्त करण्याचे ध्येय निश्चित केले आहे. यासोबतच कंपनीने 2022-30 मध्ये 10 अब्ज युनिट हरित ऊर्जा उत्पादित करण्याचे संकेत व्यक्त केले आहेत.
या संदर्भात राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना वीज मंत्र्यानी म्हटले आहे, की आगामी आर्थिक वर्षात (2022-23)मध्ये एनटीपीसीचे अपेक्षित हरित ऊर्जा उत्पादन क्षमता 10अब्ज युनिट आहे. एनटीपीसी वर्ष 2027 पर्यंत एका निश्चित ऊर्जेचे उत्पादन घेणार असल्याचे संकेत आहेत.
एनटीपीसेने 70 वीज केंद्राव्यतिरिक्त हरित ऊर्जा उत्पादन क्षेत्रातही पाय ठेवले आहेत. एनटीपीसी सौर, पवन आणि जलविद्युतसह 2,095.5 मेगावॅट ऊर्जेची क्षमता प्राप्त करण्यावर येत्या काळात भर देणार असल्याची माहिती आहे.