वार्ताहर/ वरकुटे
जैसलमेर ते लोन्गेवाला शंभर मैल (160 किमी) हेल रेस सीरिजमधील बॉर्डर दौड स्पर्धेत वडजल (ता. माण) येथील तृप्ती चव्हाण यांनी 27 तास 38 मिनिटामध्ये स्पर्धा जिंकून एकमेव ािस्aत ग्हिग्sप चा सन्मान प्राप्त केला. दिवसा 35 अंश आणि रात्री पाच अंश तापमान असलेल्या वातावरणातील उतार चढाव यामुळे अत्यंत कठीण समजली जाणारी ही रेस 50, 100 किमी आणि 100 मैल (160 किमी) या आवर्तनामध्ये घेण्यात आली होती.
या धावक क्रिडा स्पर्धेत 48 स्पर्धकांनी 100 मैल श्रेणीत भाग घेतला होता. त्यापैकी फक्त 30 धावक खेळाडू शर्यत पूर्ण करू शकले व त्यांपैकी तृप्ती या एकमेव महिला धावक ठरल्या आहेत. मूळच्या वडजल गावच्या असलेल्या तृप्ती या घ्ऊ ज्rदािssग्दहत् आहेत आणि त्यांचे पती भारतीय नौदलात अधिकारी आहेत. कोरोना साथीतील लॉकडाऊन कालावधीत (जून 2020) त्यांनी धावण्याचा सराव केला होता. धावण्याच्या शर्यतीस सुरुवातीस बाधा आणणारे त्यांच्या शरीराचे वजन बाधा आणत असल्याची वस्तुस्थिती निदर्शनास येताच त्यांनी दोन महिन्यात मोजकाच आहार घेऊन व्यायामाने तब्बल 18 किलो वजन कमी करण्यात यश मिळवित या खेळाचा सराव करीत rल्हहग्हु चा पाया भक्कम केला.
त्यानंतर कठीण परिश्रम व स्वयंशिस्तीच्या बळावर त्यांनी अतिशय कमी वेळात ल्त्tra स्aratप्दह चे असाध्य ध्येय साध्य केले. लॉकडाउनमुळे सुरुवातीला न्ग्rtल्aत् स्aratप्दह aह् प्aत् स्aratप्दह च्या माध्यमातून त्यांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने आपली सहनशक्ती वाढवली. या स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी त्यांनी पहहल्r ँaस्ंल् ळत्tra (100 क्स्), पहहल्r ँaस्ंल् 6 प्rs rल्ह, ऱँिं एtadग्ल्स् rल्ह, उद Rग्न श्aratप्दह या व अशा अनेक फुल मॅरेथोन आणि ल्त्tra स्aratप्दह मध्ये सहभाग घेतला आहे आणि ज्द्ग्ल्स् ग्हिग्sप् देखील केले आहे. त्या स्वतः नोकरीस असुन त्यांना तीन वर्षांचे बाळ आहे, घरगृहस्ती सांभाळून केवळ एका वर्षात तृप्ती जाधव यांनी क्रिडा क्षेत्रात घेतलेली गरूडझेप प्रशंसनीय अशीच आहे. त्यांच्या या यशाचे माण तालुक्यात सर्वत्र कौतुक केले जात आहे.