24/7 सेवा होणार उपलब्ध ः हाऊस ऑफ चियरची घोषणा
मुंबई
एन्टरप्राईजेस म्हणजे व्यवसायांना पुन्हा सावरण्यासाठी happyness.me यांनी भारतीय कंपन्यांसाठी सहा महिन्यांसाठी ‘एम्पलॉयी व्हॉईस 24/7’ यासारखा मोफत प्लॅटफॉर्म सादर करण्याचा निर्णय हाऊस ऑफ चियरने घेतला आहे.
जसजसे कोरोना महामारीचे संकट वेगाने वाढत आहे, तसतसे लहान आणि मोठय़ा कंपन्यांचे कर्मचारी सदरच्या संकटातून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचे पूर्ण प्रयत्न राहणार आहेत. ते फक्त महामारीतून सावरणार नाहीत, तर ते पुढे निर्माण होणाऱया समस्यांना तोंड देण्याची भक्कम तयारी करणार असल्याची माहिती आहे. परंतु याच कालावधीत कंपन्या व त्यांच्या कर्मचाऱयांचा आत्मविश्वास सकारात्मक ठेवण्यासाठी यासह संकटाचा सामना करण्यास मजबूती मिळावी याकरीता ही सुविधा तयार करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.
एमएसएमईएस – मोठय़ा कंपन्यांना मोफत सेवा
राज नायक यांची कंपनी हाऊस ऑफ चियर यांनी घोषणा केली आहे, की टेक्नॉलॉजीवर आधारीत ‘एम्पलॉयी व्हॉईस’ प्लॅटफार्म आणि मध्यम कंपन्यांसोबत मोठय़ा कंपन्यांना मोफत सुविधा सादर करणार आहे. सदरचा प्लॅटफॉर्म हा संकटांशी लढण्यास सहाय्य करत प्aज्ज्ब्हे.स या ब्रँडसोबत एम्पलॉयी व्हॉईस 24/7 कंपन्यांना सहा महिन्यांपर्यंत सर्व्हिस मिळत राहणार आहे.