ऑक्सिजन, हॉस्पिटल बेड्स आणि मेडिसिनसाठी जवळपास 17.85 कोटी देणार
मुंबई
कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये जगभरातील विविध देश भारताला मदतीचा हात देत आहेत. याच्यासह आघाडीवरच्या कंपन्यांचा यात समावेश आहे. सायन्स ऍण्ड टेक क्षेत्रातील कंपनी मर्कने मोठी घोषणा केली आहे. कंपनी ऑक्सिजन, हॉस्पिटल बेड्स आणि मेडिसिनसाठी जवळपास 17.85 कोटी रुपये देणार असल्याची माहिती आहे.
मर्क इंडियाकडून मिळणाऱया सहाय्यता रक्कमेचा वापर 250 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स, 100 व्हेंटिलेटर युनिटचे इक्विपमेंट आणि चार हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन उत्पादनाचे मशीन लावण्यात येणार असल्याची माहिती आहे.
मर्क इंडियामध्ये लाईफ सायन्स रिसर्च सोल्यूशनचे प्रमुख सुनील पंजाबी यांनी म्हटल्याप्रमाणे, देशामध्ये कोरोनाच्या दुसऱया लाटेमध्ये दैनंदिन जीवन आणि आर्थिक स्थिती प्रभावीत झाली आहे. यामध्ये संघटनेची जबाबदारी वाढली असल्याचेही यावेळी नमूद केले आहे.
प्रंटलाईन व आरोग्य कर्मचाऱयांसाठी मदत
या अगोदर कंपनीने सीएसआर कामामध्ये फ्रन्टलाईन आणि आरोग्य कर्मचाऱयांसाठी जवळपास 1.60 लाख चेहऱयाचे मास्क, सॅनिटायझरसह थर्मल स्कॅनरसोब गरजवतांना शिधा देणार असल्याचे सांगितले आहे.