कंपनी लवकरच आयपीओ आणण्याच्या तयारीत
वृत्तसंस्था/ मुंबई
देशातील सर्वात मोठी विमा आणि बाजारातील गुंतवणूक कंपनी भारतीय जीवन विमा निगमने (एलआयसी) शेअर बाजारामधून 13 हजार कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासोबतच कंपनीने प्रीमियमच्या आधारे 87.30 हजार कोटी रुपयांची रक्कम मिळवली आहे, अशी माहिती एलआयसीचे एमडी राज कुमार यांनी दिली आहे.
आगामी काळात एलआयसी देशातील सर्वात मोठा आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. परंतु मूल्य आणि अन्य कायद्यातील बदलातील दिरंगाईमुळे याला काहीसा उशीर होणार असल्याचे संकेत आहेत. एलआयसीला इक्विटी पोर्टफोलियोमधून समाधानकारक नफा झाला असल्याचे समजते.
ऑगस्टपर्यंत एकूण 87,300 कोटी रुपयांचा विमा प्राप्त केला आहे. तसेच हा मागील वर्षाच्या तुलनेत 13.5 टक्क्मयांनी अधिक राहिला आहे. कोविड19 च्या महामारीमुळे वित्त वर्ष 2019ते20 च्या अंतिम पंधरवडय़ात नवीन रिन्यूअल प्रीमियम मध्ये जवळपास 45,000 कोटी रुपयांचे नुकसान एलआयसीला झाले आहे. परंतु अनलॉकच्या निर्णयानंतर काही प्रमाणात यात सुधारणा होत असल्याची नोंद करण्यात आली आहे.
आयपीओतून 80 हजार कोटी उभारणार
एलआयसीच्या 10 टक्क्मयांच्या हिस्सेदारीच्या मदतीने 80 हजार कोटी रुपये उभारले जाणार आहेत. सध्या कंपनीचे प्रीमियमचे ऑनलाईन संकलन वधारले आहे. आगामी 2021 पर्यंत बाजारात आयपीओ सादर करण्याची तयारी एलआयसी करते आहे.