जिल्हा 31 व्या स्थानावर घसरला : गतवर्षीच्या तुलनेत निकालाचा टक्का घसरला : चिक्कोडी जिल्हा ब श्रेणीसह बेळगावच्या पुढे राज्याचा निकाल 71. 80 टक्के : राज्यात 5 लाख 82 हजार 316 विद्यार्थी उत्तीर्ण : निकालात चिक्कबळ्ळापूर प्रथम स्थानावर
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाच्या संकटछायेतही कर्नाटक माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या एसएसएलसी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला यामुळे परीक्षेनंतर लागलेली निकालाची उत्सुक्ता निकालाबरोबर संपली आहे. तू चाल पुढं… या आत्मविश्वासाने मिशन एसएसएलसीचा टप्पा पुर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी निकाल जाहीर होताच सुटकेचा निश्वास सोडला. राज्याचा निकाल 71. 80 टक्के लागला असून राज्यात 5 लाख 82 हजार 316 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बेळगाव शैक्षणिक जिल्हा यंदा 31 व्या क्रमांकावर घसरला असून जिल्हयाने निकालात क श्रेणी मिळविली आहे. यामुळे गतवर्षीच्या तुलनेत जिल्हयाचा निकालाचा घसरण झाली आहे. यामुळे चिक्कोडी जिल्हयाच्या तुलनेत बेळगाव जिल्हा ढ ठरला आहे.
2019-2020 या शैक्षणिक वर्षाची एसएसएलसी परीक्षा पुर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे 27 मार्च ते 9 एप्रिल दरम्यान होणार होती. मात्र कोविड 19 चा धोका वाढल्याने परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली. मात्र अखेर परीक्षा मंडळाने तीन महिन्यानंतर 25 जून ते 4 जुलै दरम्यान मिशन दहावी फत्ते केले. गतवर्षी बदलेला अभ्यासक्रम, यंदा बदलेले प्रश्नपित्रकेचे स्वरुप शिवाय ब्लू प्रिंटशिवाय प्रश्नपत्रिकेचे स्वरुप समजून घेणे अशा अनेक अडचणीत भर म्हणजे कोरोनाचे संकट, तितकीच संसर्गाची भिती, विलंबाचे ग्रहण, तीन महिने सुट्टी, अभ्यासाचा ताण अशा अनेक समस्यांना सामोरे जात एसएसएलसीचे धनुष्य पेलले. आपल्या परीश्रमपुर्वक अभ्यासाच्या जोरावर चमकदार कामगिरी करुन निकालातून आपले कर्तुत्व सिद्ध केले.
बेळगाव शैक्षणिक जिल्हयातून एकूण 33 हजार 180 विद्यार्थ्यांनी एकूण 124 केंद्रावर एसएसएलसीची परीक्षा दिली. कॉपी सारख्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सीसीटिव्हीची सक्ती होतीच शिवाय सामाजिक अंतर राखण्यासाठी एकमेकांमध्ये 3 फुटाचे अंतर होते. यामुळे परीक्षा पारदर्शक होण्याबरोबरच सुव्यवस्थेत पार पडली होती. मात्र व्यवस्थेत आघाडीवर असणारा बेळगाव जिल्हया निकालाबाबत जिल्हा निकालात पाठीमागे पडला आहे.
गतवर्षी बेळगाव शैक्षणिक जिल्हयाचा निकाल 77. 43 टकके लागला होता. यामुळे राज्यात बेळगाव जिल्हा 24 व्या स्थानी होता. मात्र निकलात घसरण ^झाली असून श्रेणी पद्धतीनुसार बेळगाव जिल्हा ब श्रेणीत आहे. बेळगावच्या तुलनेत चिक्कोडी शैक्षणिक जिल्हा बी श्रेणी घेत पुढे गेला आहे.
तालुकानिहाय निकाल
बेळगाव शैक्षणिक जिल्हा निकालात घसरला असून जिल्हा शेवटून चौथ्या क्रमांकावर आहे. चिक्कोडी शैक्षणिक जिल्हयाच्या तुलनेत यंदा देखील बेळगाव पाठीमागे आहे. बेळगाव जिल्ह्यानें क श्रेणी घेतली असून विभागनिहाय निकालात बेळगाव शहर क स्थानावर आहे. जिल्हयातील सहा तालुक्यापैकी एक ही तालुका अ श्रेणीत आहे. यामुळे व्यस्थेच्या दृष्टीकोनाने आघाडी घेतलेल्या बेळगाव जिल्हयाची निकालात घसरण झाली आहे. यावर्षे पासून निकाल श्रेणीनिहाय जाहीर करण्यात आला असल्याने सरासरीनुसार निकाल कमी लागला आहे.
बेळगाव शहर देखील निकालात क श्रेणीत असून 108 शाळापैंकी केवळ 13 शाळा अ श्रेणीत अर्थात विशेष श्रेणीसह निकालात पुढे आहेत. तर सरासरी 60 ते 75 टक्कयांमध्ये असलेल्या केवळ 30 शाळा आहेत. तर क शेणीत म्हणजेत 60 टककयांच्या आत निकाल लागलेल्या शाळांची संख्या 65 टक्के आहे. बेळगाव बेळगाव शहरातून सर्वाधिक म्हणजेच 9,754 विद्यार्थी तर कित्तूर मधून सर्वात कमी 1, 870 विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले होते. यामुळे जिल्हयाच्या टक्केवारीत बेळगाव शहरातील निकालाची विशेष भर होती. मात्र शहर विभाग घसरला आहे.
अ.क्र | शैक्षणिक विभाग (तालुके) | श्रेणी |
1 | बेळगाव शहर | क |
2 | बेळगाव ग्रामीण | ब |
3 | बैलहोंगल | ब |
4 | सौंदत्ती | क |
5 | कित्तुर | क |
6 | रामदुर्ग | ब |