शेती क्षेत्राशी संबंधीत उपकरणांची निर्मिती करणारी कंपनी एस्कॉर्ट्सच्या ऍग्री मशीनरी ट्रक्टरची विक्री नोव्हेंबरमध्ये 33 टक्क्यांनी वधारुन 10,165 वर पोहोचली आहे. मागील वर्षातील नोव्हेंबरमध्ये कंपनीचा याच विक्रीचा आकडा 7,642 वर राहिला होता. देशातील बाजारात सदर ट्रक्टरची विक्री 30.9 टक्क्यांनी वधारुन 9,662 च्या घरात राहिली आहे. तर 2019 नोव्हेंबरमध्ये विक्री 7,379 राहिल्याची नोंद आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये निर्यात 503 अंकांवर राहिल्याचे कंपनीने मंगळवारी दिलेल्या माहितीमधून सांगितले आहे.
Previous Article5-जी कनेक्शन 35 कोटीवर पोहोचणार
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.