पोलिसांनी काम रोखले, ड्रेनेज वाहिनी घालण्याचे काम रात्री करण्याची सूचना
प्रतिनिधी /बेळगाव
सध्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खरेदी करण्यासाठी शहरात गर्दी वाढली आहे. बाजारपेठेत पादचाऱयांना ये-जा करण्यासाठी रस्ता मिळत नाही. अशा स्थितीत दरबार गल्ली परिसरात डेनेज वाहिनी घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र ऐन सणात वाहतूक कोंडी होण्याची शक्मयता असल्याने पोलीस प्रशासनाने काम बंद करण्याची सूचना करून जेसीबी परत पाठविला.
कोरोना विषाणू आणि लॉकडाऊनमुळे कोणताच सण साजरा करता आला नाही. मागील वर्षी नागरिकांना घरात बसून सण साजरा करावा लागली. पण यंदा कोरोनाचे निर्बंध मागे घेण्यात आल्याने दिवाळी सणासाठी खरेदीला उधाण आले आहे. खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत असून परराज्यामधून खरेदीकरिता नागरिक येत आहेत. त्यामुळे शहरातील सर्वच रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. अशा स्थितीमध्ये दरबार गल्ली परिसरात डेनेज वाहिनी घालण्याचे काम हाती घेण्यात आले. मंगळवारी सकाळी 11.30 वाजता बाजारपेठेत गर्दी झाला असतानाच जेसीबीच्या सहाय्याने दरबार गल्लीत डैनेज वाहिनी घालण्यासाठी खोदाईचे काम हाती घेण्यात आले. मात्र याला रहदारी पोलीसांनी आक्षेप घेतला. सध्या बाजारपेठेत गर्दी वाढली असून वाहतूक कोंडी होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे सदर काम रात्रीच्यावेळी करण्याची सूचना पोलिसांनी केली. पण काही नागरिकांनी पोलिसांबरोबर वाद घालण्याचा प्रयत्न केला. दिवाळी सणामुळे गर्दी वाढली असून आता खोदाई केल्यास वाहतूक कोंडी होईल तसेच नागरिकांना व व्यावसायिकांना अडचण निर्माण होऊ शकते. निर्माण होणाऱया समस्येचा विचार करून सदर काम रात्री करण्याची सूचना पोलिसांनी केली. तसेच जेसीबी परत पाठविण्यात आला.