समोर आल्यावर ग्राहकांना समजते डिश
जर तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेला तर तुम्हाला वेटर खाद्यपदार्थ सर्व्ह करत असतो. ग्राहकांचे समाधान करण्यासाठी हे कर्मचारी अत्यंत तत्पर असल्याचे दिसून येते. ऑर्डर घेतल्यावर लवकरात लवकर डिशेस आणण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. परंतु जपानमध्ये एक असे रेस्टॉरंट आहे, जेथील वेटर्सचे कृत्य जाणून घेतल्यावर तुम्ही दंग व्हाल. कारण येथील वेटर ऑर्डर घेतल्यावर ती विसरून जातात.
2017 मध्ये टोकियोमध्ये ‘द रेस्टॉरंट ऑफ मिसटेकन ऑर्डर्स’ या नावाने एक रेस्टॉरंट सुरू झाले, जे अनोख्या कारणामुळे जगभरात प्रसिद्ध झाले आहे. शीरो ओगुनी यांच्याकडून सुरू करण्यात आलेल्या या रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱया सर्व वेटर्सना डिमेंशिया म्हणजे स्मृतिभ्रंशाचा आजार आहे.
विसरण्याचा आजार
विस्मृतीचा आजार असल्याने टेबलवर बसताना दिलेल्या ऑर्डरपेक्षा वेगळीच डिश सर्व्ह केली जाते. लोकांना डिमेंशियाबद्दल खूपच गैरमसजत आहेत. डिमेंशिया असलेले लोक समाजात राहू शकत नाहीत असे लोकांना वाटते. ते स्वतःसाठी काहीच करू शकत नाही अशीही धारणा असली तरीही हे सत्य नसल्याचे ओगुनी यांनी म्हटले आहे.
37 टक्के चुकीच्या असतात ऑर्डर
हे रेस्टॉरंट सुरू झाल्यापासून स्टाफने केलेल्या पाहणीत 37 टक्sक डिश चुकीने सर्व्ह केल्या गेल्याचे आढळून आले. तरीही 99 टक्के ग्राहकांनी आनंद व्यक्त केला आहे. जपानच्या लोकांमध्येही या रेस्टॉरंटवरून मोठी क्रेझ आहे. रेस्टॉरंटमध्ये काम करणारे बहुतांश लोक वृद्ध असून त्यांना डिमेंशिया आहे. जपान सरकारनेही या रेस्टॉरंटच्या अनोख्या स्टाइलचे प्रचंड कौतुक केले आहे. सोशल मीडियावरही रेस्टॉरंटची चर्चा होत असते.