ऑनलाईन टीम / टोकियो :
टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजी इव्हेंटमधील पुरुषांच्या इलेमिनेशन गटात जागतिक क्रमवारीतील द्वितीय मानांकित गॅल्सन, बॅझरपो यांचा सनसनाटी पराभव करून सातारच्या प्रवीण जाधवने बाद फेरीत धडक मारली.
ऑलिम्पिकमध्ये पहिल्या तीन क्रमांकापैकी एखाद्या अव्वल तिरंदाजाला भारतीय तिरंदाजाने पराभवाचा धक्का देण्याची ही पहिलीच वेळ आहे. या धडाकेबाज विजयानंतर प्रवीण जाधव दुसऱ्या फेरीत पोहचला असून, अमेरिकेच्या ब्रॅडी इलीसन सोबत भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1.22 मिनिटांनी या लढतीला प्रारंभ होईल.