वार्ताहर / कुंभोज
कुंभोज (ता हातकणंगले) येथील क्रिश अतिश मलकेकर याने जयपुर राजस्थान येथे झालेल्या ऑल इंडिया युथ गेम कराटे चॅम्पियन शिप 2021 मध्ये 63 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. क्रिश हा सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी असून त्याने मागील वर्षभरात चांगली कामगिरी करत विविध स्पर्धांमध्ये एकूण पाच सुवर्ण पदक व रौप्य पदकाची कमाई केली आहे.
क्रिश याच्या सदर दमदार कामगिरीमुळे त्याची पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. सदर निवडीमुळे कुंभोज गावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यामुळे कुंभोज सह परिसरातून क्रिश यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. सदर निवडीसाठी क्रिश याला क्रीडाशिक्षक श्री पाटील सर, वडील अतिश मलकेकर, आई रिना मलकेकर, तसेच सर्व मलकेकर कुटुंबीयांचे मार्गदर्शन लाभले.दि. ८ सप्टेंबर रोजी कुंभोज येथे जल्लोषात स्वागत होणार आहे. ग्रामस्थांच्या कडून क्रिशच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे.